Visawa Bahuuddeshiya Sanstha — Working Across Maharashtra for Children, Women, Youth & Community

Visawa Bahuuddeshiya Sanstha

प्रत्येक बालक सुरक्षित, शिक्षित आणि सन्मानाने जगण्याचा हक्कदार आहे

बाल संरक्षण, शिक्षण, सायबर सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृतीसाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत.

Visawa Bahuuddeshiya Sanstha

महिला सक्षमीकरणातून समाज विकास

महिलांसाठी मार्गदर्शन, जनजागृती, कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी विविध उपक्रम.

Visawa Bahuuddeshiya Sanstha

जागरूक युवक म्हणजे सक्षम भारत

युवकांसाठी सायबर सुरक्षा, करिअर मार्गदर्शन, सामाजिक नेतृत्व आणि कौशल्य विकास कार्यक्रम.

संस्थेबद्दल

बाल संरक्षण व समाज विकासासाठी समर्पित संस्था

विसावा बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ ही समाजातील वंचित, गरजू, दुर्लक्षित तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्य करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. संस्था बाल संरक्षण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षा, सामाजिक जनजागृती, समुपदेशन आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत आहे.

Our approach is simple: spend time in the community first, understand what is actually needed, then build programmes with local volunteers, panchayats and partner institutions rather than around them.

60+Villages reached
300+Active volunteers
12Years of work
Visawa Bahuuddeshiya Sanstha team and community members at a field programme
Our team on the ground — the same faces you'll meet at a village programme.

What Guides Us

आमचे ध्येय& आमची दृष्टी
आमचे ध्येय

१. बाल संरक्षण व बाल हक्कांविषयी जनजागृती करणे
२. गरजू बालकांना आर्थिक, शैक्षणीक , आरोग्य विषय मदत व मार्गदर्शन करणे
३. महिला व युवक सक्षमीकरणासाठी कार्य करणे
४. सायबर सुरक्षा व सामाजिक शिक्षण कार्यक्रम राबविणे
५. प्रशासन , पोलीस , CWC आणि समाज यांच्यात समन्वय निर्माण करणे.

आमची दृष्टी
१. शालेय व ग्रामिण भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे
२. गरजू बालकांना समुपदेशन व पुनर्वसन मदत करणे
३. महिला, युवक आणि विदयार्थ्यांसाठी मार्गदर्शन कर्यक्रम घेणे
उद्दिष्टे

उद्दिष्टे

01

बाल संरक्षण

बाल संरक्षण, बाल हक्क आणि बाल सुरक्षिततेविषयी जनजागृती करणे.

02

Good Touch - Bad Touch

शालेय विद्यार्थ्यांसाठी Good Touch – Bad Touch जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

03

सायबर सुरक्षा

विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी Cyber Safety Awareness कार्यक्रम राबविणे.

04

जनजागृती कार्यक्रम

शालेय व ग्रामिण भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

05

समुपदेशन

गरजू बालक, महिला व युवकांना समुपदेशन व पुनर्वसन सहाय्य उपलब्ध करून देणे.

06

मार्गदर्शन कर्यक्रम

महिला, युवक आणि विदयार्थ्यांसाठी मार्गदर्शन कर्यक्रम घेणे.

कार्य क्षेत्र

नांदेड जिल्हा व ग्रामीण व आदिवासी क्षेत्र

१. समाजाभिमुख कार्य

समाजातील गरजू, वंचित व दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जनजागृती, आरोग्य, स्वच्छता, आरोग्य सेवा, सामाजिक ऐक्य, मानवाधिकार संरक्षण आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.

२. शिक्षण

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक मार्गदर्शन, कौशल्य विकास, डिजिटल शिक्षण, स्पर्धा परीक्षा तयारी, शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

३. सायबर सुरक्षा

सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहारातील सुरक्षा आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा आणि मार्गदर्शन दिले जाते.

४. महिला

महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन, आर्थिक प्रगती, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य जनजागृती, महिला हक्क, नेतृत्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

५. समुदाय

समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य शिबिरे, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक एकात्मता, ग्रामविकास, पाणी संवर्धन आणि सार्वजनिक हिताचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

६. समुपदेशन

विद्यार्थी, युवक, महिला, पालक आणि कुटुंबांना वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक, मानसिक आरोग्य व कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन सेवा दिली जाते. सकारात्मक जीवनशैली आणि योग्य निर्णयक्षमतेसाठी मार्गदर्शन केले जाते.

आमच्याशी जोडा

स्वयंसेवक नोंदणी

समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आमच्यासोबत सहभागी व्हा.

  • बाल शिक्षण उपक्रमात सहभागी व्हा.
  • आरोग्य व जनजागृती कार्यक्रमात योगदान द्या.
  • समाजसेवेत आपला वेळ आणि कौशल्य द्या.

आमचे प्रमुख कार्यक्रम

कार्यक्रम

08 वर्षभर

बाल हक्क जनजागृती अभियान

बाल संरक्षण, बाल हक्क व बाल सुरक्षिततेबाबत शाळा व गावांमध्ये कार्यक्रम.

अधिक माहिती
21 वर्षभर

सायबर सुरक्षा जनजागृती

विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी Cyber Safety Awareness कार्यशाळा.

स्वयंसेवक
14 विशेष अभियान

Good Touch – Bad Touch

लहान मुलांसाठी सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श याविषयी मार्गदर्शन.

अधिक माहिती
0मदत केलेली मुले
0
Warning: Undefined array key "women_empowered" in /var/www/vhosts/visawango.org/httpdocs/index.php on line 896
0पोहोचलेली गावे
0
Warning: Undefined array key "active_volunteers" in /var/www/vhosts/visawango.org/httpdocs/index.php on line 898

त्यांच्या शब्दांत

आमच्याबद्दल प्रतिक्रिया

बाल संरक्षण जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि पालकांनाही योग्य मार्गदर्शन मिळाले.

S
शाळेचे मुख्याध्यापकयवतमाळ

सायबर सुरक्षा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे समजले.

R
विद्यार्थीसायबर सुरक्षा अभियान

संस्थेच्या समुपदेशनामुळे अनेक गरजू बालकांना योग्य दिशा आणि मदत मिळाली.

A
पालकबाल संरक्षण कार्यक्रम

एकत्रितपणे कार्यरत

सहकार्य करणाऱ्या संस्था

शाळा
पोलीस विभाग
CWC
स्थानिक प्रशासन
सामाजिक संस्था

आमच्याशी संपर्क साधा

विसावा बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क साधा

आपल्याला काही प्रश्न, सूचना किंवा सहकार्याबाबत माहिती हवी असल्यास खालील फॉर्म भरून किंवा दिलेल्या संपर्क माध्यमांद्वारे आमच्याशी संपर्क साधा.

  • पत्तापत्ता : रा. जवळा (ई), ता. यवतमाळ, जि. यवतमाळ - ४४५००१
    कार्यालयाचा पत्ता : रा. राजस्व सोसायटी, जय विजय चौक, यवतमाळ - ४४५००१
  • दूरध्वनी+91 9403605593, +91 9404119300